
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
बीड (गेवराई/उमापूर)उमापूर मधील एसबीआय बँकेचे मनमर्जी पणाने चालत असलेल्या कामामुळे.शेतकरी वैतागले,पी एम किसान सन्मान निधी योजनांची पैसे खात्यात शेतकऱ्यांच्या जमा होताच बँक खाते होल्ड केले जाते,येथील या बँकांमध्ये शेतकऱ्यांची वेळो ,वेळी अडवणूक केली जाते.शेतकऱ्यांना आपल्या खात्यातली पीएम किसान सन्मान योजनांचे पैसेही काढता येत नसल्याने,व शेतकऱ्यांना महिना महिना चक्कर मारावी लागते,तरीही एसबीआयचे मॅनेजर याकडे लक्ष देत नसल्याने,नागरिक वैतागले,
उमापूर शाखेच्या बँकेत १६ ते १७ खेड्यांच्या लोकांची गर्दी असते.या बँकेती काम वेळेवर होत नाही,
शेतकऱ्यांच्या खात्यावर असलेली पहिली ही रक्कम त्यांना मिळत नाही
व पंतप्रधान पी एम किसान योजनेचेही पैसे त्यांना मिळतसल्याने
काय करावे हे देखील सुधरत नाही.
उमापूरची ही एस बी आय ची शाखा
शेतकऱ्यांच्या मुळावर उठली असून
मनमर्जी पणाने शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केले जाते,कारण ते कर्ज खाते असल्याने शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खात्यामुळे कोणते ही काम होत नसल्याने.
या बँका फक्त शेतकऱ्यांनाच का आडवतात,बिझनेस मॅन भारताचे मोठमोठे लोकांनी जे आत्तापर्यंत कर्ज घेऊन परतफेड केली नाही व पळून गेले ते यांनी सोडून दिले,त्यांना का पकडून आणत नाही त्यांच्यावर का कार्यवाही होत नाही,याले लोकांनी शेतकऱ्यांना आडवण्याचा ठेका घेतलेला असून,यांनी आता हे काम बंद केले पाहिजे,शेतकऱ्यांचा पैसा कधी बुडत नाही,हे यांना माहित नाही का…शेतकऱ्यांनी त्यांची शेती गहाण ठेवून बँकेतून कर्ज घेतलेले आहे.
शेतकऱ्याची शेती बँकेकडे गहाण असून मग खाते होल्ड का करतात,
एक तर शेतकऱ्यांवर निसर्गाचा प्रकोपसारखाच सुरू असतो,त्यात मुखाशी आलेला घास निघून जातो
आणि पेरणीच्या वेळेस शेतकऱ्याचे खाते असे होल्ड केलेे जाते.
हे बँकांना पटले पाहिजे,
शेतकऱ्यांचे खाते होल्ड करू नयेत असे शासनाकडून निर्देश ही देण्यात आलेले आहे परंतु हे लोक आपल्या मनमानी पासून बाहेर येत नाही.
यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजगीचे वातावरण दिसून येतआहे.