
दैनिक चालू वार्ता…
चाकूर तालुका प्रतिनिधी किशन वडारे
रात्रीच्यावेळी पोलीस गाडी गस्त घालत असताना, एक बोलेरो पिकअप जनावरे भरून जात होती, त्या बोलेरो गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतू ती गाडी न थांबता वेगाने निघून गेल्यामुळे पोलिसांना संशय आल्याने सदरील बोलेरो पिकअप चा पाठलाग करून पकडले असता सदरील पिकअप ही जनावराची चोरी करून वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असता पिकअप मधील असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या .
सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम व पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे व पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील यांच्या टीमने एक गाय व एक कालवड जप्त करून दोन आरोपिंना अटक केली आहे.
आरोपी ज्ञानोबा नागनाथ मोहाळे रा.कातकरवाडी ता.अंबाजोगाई जि. बीड व मारुती दत्तराव हरगिले रा. कासरवाडी ता. गंगाखेड जि. परभणी हे बोलेरो पिकअपमध्ये एक गाय व एक कालवड चोरून घेऊन जात असल्याचा संशय चाकूर पोलिसांना आल्याने पोलिसांनी याची कसून चौकशी केली असता दोन्ही गायी चोरून घेऊन जात असल्याची खात्री झाल्यामुळे या दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन गायी अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये व बोलेरो पिकअप अंदाजे किंमत तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख पन्नास रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या आरोपीनी चोरीच्या गुन्ह्यांची कबूली दिली असून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस हवालदार सिरसाठ, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस हवालदार लांडगे, चालक पोलीस नाईक, चपडे, पेद्देवाड, मस्के यांनी मोलाची कामगिरी बजावली…