
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे. .
देगलूर: सध्या राजकीय परिस्थिती पाहता देगलूर बिलोली मतदार संघासाठी दिपक कांबळे रामपूरकर यांनी देगलूर बिलोली मतदार संघाची जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून स्थानिक आमदारांनी या मतदारसंघाच्या विकासाठी विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी प्रश्न मांडले नसून मंजूर झालेला विकास निधी देखील वापस गेला आहे. त्यामुळे राखीव मतदारसंघ पुन्हा विकासापासून वंचित झाला असून आगामी 2024 च्या निवडणूकीत देगलूर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी इच्छा असल्याने तमाम जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आज तुमच्या भेटीला आलो तसेच पक्ष कोणताही असो सर्वजनतेला विश्वासात घेऊनच आगामी निवडणूक लढविणार असल्याचे मत मुजळगा येथे दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले व येथील जनतेसमोर दिपककांबळे रामपूरकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.