
नरसिंह नगर येथे होणार भव्य दिव्य गणेश मंदिर…
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सोलापूर माढा: नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर, टेंभुर्णी यांच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या श्री गणेश मंदिरासाठी स्वईच्छेने मदत करण्याचे आव्हान नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. याच आव्हानाला प्रतिसाद देत नामदेव महाराज धोत्रे, दिलीप भाऊ पवार, ऋषिकेश बंटी नाना बोबडे व मधुकर आण्णा देशमुख या गणेश भक्तांनी पुढाकार घेऊन या मंदिरासाठी मदत करण्याचे ठरवले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी लागणारी वीट ही नामदेव महाराज धोत्रे व दिलीप भाऊ पवार यांच्याकडून ५० हजार रुपये किंमतीची ५ हजार वीट देण्यात येणार आहे. तसेच ऋषिकेश बंटी नाना बोबडे यांच्याकडून २१ हजार रुपये किंमतीचे स्टील आणि मधुकर अण्णा देशमुख यांच्याकडून तीन ब्रास खडी त्याचबरोबर महेश चौधरी, दादासाहेब कोळपे, संतोष आप्पा खैरमोडे, मयूर होदाडे, पोलीस अंमलदार अमृत खेडकर यांनी सिमेंट देवून योगदान दिले आहे.
नरसिंह प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये राबविण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रतिष्ठानचा बोलबाला हा संपूर्ण माढा तालुक्या बरोबरच सोलापूर जिल्ह्यामध्ये वाढला आहे आणि या प्रतिष्ठानला सर्व स्तरातून लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. प्रतिष्ठानच्यावतीने सर्व सण, उत्सव खूप मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरे केले जातात. संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा गणेश उत्सव हा नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीनेही प्रत्येक वर्षी खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक दिवशी काही ना काही सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी व सामाजिक ऐक्य जपण्याचे काम केले जाते.
नरसिंह नगर येथील महिलांची खूप वर्षापासून या ठिकाणी सार्वजनिक गणेश मंदिर बांधण्याची मागणी होती. या मागणीला नरसिंह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मंडळाच्या शिल्लक असलेल्या पैशातून आणि लोकसहभागातून गणेश मंदिर बांधण्याचे ठरविले, आणि या गणेश मंदिराचा भूमिपूजन सोहळा १८ जुलै रोजी करण्यात आला. या मंदिरासाठी अंदाजे दहा ते अकरा लाख रुपये खर्च येणार आहे. तरी नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने या मंदिरासाठी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक आणि गणेश भक्तांना मदत करण्याचे आव्हान करण्यात आले होते. आणि या आवाहनाला प्रतिसाद देत नामदेव महाराज धोत्रे, दिलीप भाऊ पवार, ऋषिकेश बंटी नाना बोबडे, मधुकर आण्णा देशमुख,महेश चौधरी, दादासाहेब कोळपे, संतोष आप्पा खैरमोडे, मयूर होदाडे, पोलीस अंमलदार अमृत खेडकर या गणेश भक्तांनी पुढाकार घेतला आहे.या त्यांच्या मदत कार्यासाठी मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत व अजूनही या बांधकामासाठी मदत करण्यासाठी इतर गणेश भक्तांनी आर्थिक किंवा मंदिरासाठी लागणाऱ्या इतर साहित्य रुपी मदत करण्याचे आव्हान नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.