
दै.चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी राम कराळे
लोहा शहरा पासून अगदी तीन किलोमीटर जवळ असलेले कारेगाव येथील माधवराव देशमुख यांचा नातु यशराज नामदेवराव देशमुख पूर्व उच्च प्राथमिक( इयत्ता५वी) शिष्यवृत्ती परीक्षेत 300 पैकी 280 गुण संपादक करत राज्यात पहिल येण्याचा बहुमान पटकविला आहे दोन हजाराच्या पहिल्या दशकात हळद व लोहा येथील विद्यार्थी या परीक्षेत राज्यात गुणवत्ता यादीत आले होते त्यानंतर आजच्या प्रचंड स्पर्धेत काळात यशराज यांचे यश उल्लेखनीय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सीबीएससी व आय सी एस सी बोर्डातून भार्गव करिअर अकॅडमीच्या विद्यार्थी यशराज नामदेवराव देशमुख यांनी पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे यशराज ने प्रथम भाषा व गणित विषयात 150 पैकी 150 गुण संपादन केले आहे यशराज ला अकॅडमीचे संचालक भार्गव राजे यांचे विशेष मार्गदर्शन होते तसेच भास्कर रेड्डी व इतर तज्ञ शिक्षकांनी परिश्रम घेतले या अगोदर यशराज ने ऐलन टॅलेंटेक्स परीक्षेत देशात तिसरा सिल्वर झोन युनिफिल्ड कॉन्सिल एसओएफ आय एस टी एस इ ऑलिंप्मियाड या परीक्षेत यश संपादन केले सह्याद्री इंग्लिश स्कूल लोहा चे संचालाक सुदर्शन शिंदे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले यांनी अनमोल मार्गदर्शन केले यशराज या यशाबद्दल आय आय बी चे संचालक दशरथ पाटील देशमुख, दीपक शिराळे ,बाबुराव कीडे यांनी अभिनंदन केले आहे सीबीएस इ- आयसीएससी या बोर्डाच्या स्कॉलरशिप परीक्षेत राज्यात प्रथम आल्याबद्दल कारेगाव ग्रामस्थ तसेच तालुक्यातील जिल्ह्याच्या गुणवत्ते त मानाचा शिरपेच रोवला आहे…