
रस्ता नाहीच,तर लोकांचा जीव घेण्याचा खेळ मांडला..
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
बीड उमापूर ठाकरवाडी ठाकरवाडी ही सात आठ तांडे वस्ती असून,व हाच रस्ता श्री क्षेत्र राक्षस भुवन ला पुढे जातो,या रस्त्याची अशी बेकार अवस्था झाली की,कोणतेही वाहन धडाने चालत नाही,येथून टू व्हीलर फोर व्हीलर ने जाता येत नसल्याने येथील नागरिकांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो.थोड्याच पावसात ज्या रस्त्याची अशी बिकट परिस्थिती होऊन जाते की,या रस्त्यावरून धड चालताही येत नसल्याने,येथील नागरिकांना दवाखान्यात इमर्जन्सी मध्ये जाण्यास व पेशंटला येथून दवाखान्यात जाण्यासाठी चक्क रस्ता देखील नाही
येथून पायी चालणे तर कठीण होते पण गाडीवर जाणेही खूप धोक्याचे असून,संबंधित अधिकारी, ग्रामसेवक, व ग्रामपंचायत, यावर डोळे झाकून बसलेली आहे का.?
असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
उमापूर व उमापूर मधील पूर्ण परिसरात रस्त्याचे असे बेकार हाल सुरू केलेले असून,याकडे का कोणाची लक्ष लागत नाही,
संबंधित अधिकारी झोपेतच आहे कि
आणखी काही गुडबंगाल आहे.
असे येथील नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
सदरील रस्त्याची लवकरात लवकर पंचनामे झाले पाहिजेत,या अधिकाऱ्यांनी जनतेचे असे हाल चालवलेले आहे.की सांगायला पण लाज वाटते.या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दहा दहा फुटाचि मोठी नाली आहे.खूप मोठी कसरत करून ठाकरवाडी व श्रीक्षेत्र राक्षस भुवनकडे जाता येते.याच रस्त्याने दहाव्याचे कार्यक्रमासाठी उमापूर परिसरातील सर्वच लोक जातात.
या रस्त्यांमुळे भाविकांनाही नाहतत्रास सहन करावा लागतो,
सदरील या गोष्टीची ग्रामपंचायत नि नोंद घेणे गरजेचे आहे.असे येथिल नागरिकांतून सांगण्यात येत आहे.