दै.चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील कळका ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक श्री. विलास नारनाळीकर यांची कंधार तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.तसेच कंधार तालुका ग्रामसेवक संघटनेच्या सचिवपदी जगदेव पाटील शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.धनंजय पाटील वडजे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १९ जुलै रोजी दुपारी २ वाजता कै. वसंतराव नाईक सभागृह पंचायत समिती कंधार येथे ग्रामसेवक संघटनेच्या कार्यकारणी निवडी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वानुमते नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली या निवडीत कळका ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.विलास नारनाळीकर यांची अध्यक्षपदी व श्री. जगदेव शिंदे यांची सचिवपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी कळका नगरीचे उपसरपंच प्रतिनिधी श्री राजीव पाटील गायकवाड , कंधार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अॅड. मारोती पाटील पंढरे,सामाजिक कार्यकर्ते श्री गिरमाजी पाटील गायकवाड , श्री.संदिप पाटील घोरबांड यांनी श्री.विलास नारनाळीकर यांचा व श्री जगदेव पाटील शिंदे यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी,तालुका कार्यकारणी पदाधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच ,उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
