
ग्लोबल इको सेव्ह सिस्टीम कंपनी वर जिल्हाधिकारी कार्यवाही करणार काय…?
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेने शहानूर नदीच्या पात्रात आढळलेल्या जैविक वैद्यकीय कचऱ्याबाबतीत योग्य त्या आस्थापनेवरील कारवाई करण्याच्या दृष्टिकोनाने ग्लोबल इको सेव्ह सिस्टीम कंपनीला १६ जून २०२३ रोजी पत्र पाठवून जैविक वैद्यकीय कचऱ्या बाबतीत माहिती विचारण्यात आली होती.सदरहू प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून १ महिना उलटून सुद्धा त्याची दखल न घेता कंपनीने नगरपरिषद कार्यालयाला उत्तर दाखल केले नाही आणि नगर परिषदेने सुद्धा इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रश्नावर पाठपुरावा केला नाही.यातून जनतेत संभ्रम निर्माण झाला असून हे प्रकरण दाबण्यात आले की काय? अशी जनतेत कुणकुण आहे.
गावातील काही नागरिकांनी सदर प्रश्न जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदना द्वारे सादर करण्याचे ठरवले असून जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.