
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा
गेल्या वर्षी पावसाळ्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने राज्यभरातील शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यापैकी मंठा तालुक्यातील मंठा तळणी आणि ढोकसाळ या महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी बांधवांना नुकसानी पोटी राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली होती ती आर्थिक मदत यापूर्वीच शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाली असून. पांगरी गोसावी हे महसूल मंडळ अनुदानापासून वंचित राहिले होते. पांगरी गोसावी महसूल मंडळातील 33 गावांमध्ये सततच्या पावसामुळे पिकांची नासाडी झाली होती. यामुळे या पांगरी गोसावी महसूल मंडळातील तिथेच गावातील नागरिकांनी माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालना जिल्हाधिकारी जालना व राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वारंवार भेटून निवेदन देऊन निधीची मागणी केली होती. माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाला यश आल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पांगरी गोसावी महसूल मंडळातील 33 गावातील शेतकरी बांधव आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार मानताना दिसत आहे. या निधीतून जिरायत क्षेत्राकरीता हेक्टरी 13600 रुपये, बागायत क्षेत्राकरीता हेक्टरी 27000 तर फळ पिकांच्या हेक्टरी 36000 असे मिळणार असूनदोन हेक्टर मर्यादेत प्रती शेतकरी अशी ही रक्कम येत्या पाच दिवसात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात कुठल्याही परिस्थितीत जमा करा अशा सक्त सूचना आमदार बबनराव लोणीकर यांनी तालुका कृषी अधिकारी मंठा तहसीलदार मंठा बीडीओ मंठा यांना दिल्या आहेत.