
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा तालुक्यातील पुर्णा नदी काठच्या १७ गावांतील अवैध जप्त वाळू साठ्याचा शुक्रवारी तहसील कार्यालयात लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात १७ लिलावधारकांनी सहभाग घेतल्याने २२ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
पूर्णा नदीपात्राशेजारी असणाऱ्या १७ गावांतील सुमारे २ हजार ५०० ब्रास अवैध वाळू साठ्याची लिलाव प्रकिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत स्थानिकांनी सहभाग घेतला. विषेश म्हणजे, ज्यांनी वाळुचा साठा केला. त्यांनीच जप्त वाळू साठ्यातील वाळू यापुर्वीच चोरुन विक्री केल्यानंतरही संबंधितांनी त्याच ठिकाणी नव्याने वाळू साठा करत किंवा करण्याच्या उद्देशाने पुन्हा लिलाव प्रकियेत सहभाग घेऊन लिलाव घेतले. या लिलावातुन अंदाजे २२ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. वाळू ब्रास व लिलावाची बोली रक्कम
सासखेडा ५८४ ब्रास कि. ४ लाख ०४ हजार ८२० रु किर्ला ३६२ ब्रास २लाख ७० हजार ४२० रु
टाकळखोपा ३०२ ब्रास २ लाख १३हजार ३००रु हनवतखेडा २७६ ब्रास १ लाख ९६ हजार ५०० रु , कानडी २६५ ब्रास १ लाख ९२ हजार २०रु, दुधा २६४ ब्रास १ लाख ९६ हजार ५००रु, लिबखेडा २१८ ब्रास १ लाख ५८ हजार ४२० रु जाभरुन ६४ ब्रास ५२ हजार ०२०रु यांसह खोरवड ५५ ब्रास ४० हजार
८२०रु वाघाळा ४० ब्रास ३७४६० रु उस्वद तीन ठिकाणी एकुन ९५ ब्रास ६८ हजार ७८० रु देवठाणा २४ ब्रास २८ हजार ५०० रु वझर , सरकटे २४ ब्रास २१ हजार ७८० रु , आनंदवाडी १५ ब्रास १७ हजार ३०० रु, पोखरी केंधळे १२ ब्रास १३ हजार ९४० रु याप्रमाणे लिलाव झाले.
लिलावातुन २३ लाखांचा महसूल या बाबत मंठा तहसीलदार रूपा चित्रक यांना विचारले असता, पूर्णा काठच्या १७ गांवातील जप्त वाळू साठ्याचा लिलावातून २२ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.