
दैनिक चालू वार्ता उप संपादक
भूम:- कारगिल युद्धातील विजय समोर ठेवून नवयुवकांनी संरक्षण दलात सहभागी होवून देश सेवेत झोकून देणे काळाची गरज आहे असे मत उपविभागीय अधिकारी वैशालीताई पाटील यांनी माजी सैनिकांच्या कार्यक्रमात बोलताना केले. बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी तालुक्यात भूम येथे माजी सैनिक संघटनेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा केला , या निमित्ताने प्रथम भारत मातेचे दीप प्रज्वलन व पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली .कारगिल युद्धात शहीद झालेल्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली व नंतर वीर जवान कुटुंबीयांचा सन्मान केला.या कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी वैशालीताई पाटील पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, निवासी तहसीलदार संजय स्वामी, लोकप्रतिनिधी बाळासाहेब क्षिरसागर, दिलीप शाळू महाराज, संजय गाढवे, ज्येष्ठ कवयित्री प्रा. अलका सपकाळ राजकीय, सामाजिक, पत्रकार, अकॅडमीसह, विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम येथील कार्यक्रम अगदी हटके झाला , नियोजनबद्ध कार्यक्रम माजी सैनिक सामाजिक बहुउदेशिय संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख, सचिव प्रभाकर हाके यांच्या नेतृत्वाखाली पोपटराव जाधव, लक्ष्मण पोळ, तात्यासाहेब सूर्यवंशी, कानिफनाथ मोराळे, प्रल्हाद कुठे , प्रमोद जाधव, दासराव पवार, डी एस जाधव, शिवाजी चव्हाण, साहेबराव झोरे, दत्तात्रय गिलबिले, प्रभाकर खोसे, प्रभाकर वरबडे, दिलीपराव भोसले, दत्ता पवार नारायण जाधव, आदिनी यशस्वी केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रगती पोतदार या महिलेने कारगिल विजय दिनाची सुंदर व आकर्षक रांगोळी काढून उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम शेखसर व शंकर खामकर यांनी केले, प्रास्ताविक कानिफनाथ मोराळे यांनी केले तर आभार विधिज्ञ भगवान नागरगोजे यांनी मानले.