
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा- तालुक्यातील कोतवाल पदाच्या 08 रिक्त जागांसाठीची लेखी परिक्षा दि. 30/07/2023 (रविवार) रोजी सकाळी 11.00 वाजता, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड उस्मानाबाद येथील केंद्रावर होणारआहे.
सदर परिक्षेसाठी ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र (Hall Ticket) मिळालेले नाहीत, अशा उमेदवारांनी दि.28/07/2023 (शुक्रवार) व दि. 29/07/2023 (शनिवार) रोजी तहसिल कार्यालय परंडा येथे समक्ष उपस्थित राहून प्रवेशपत्र हस्तगत करावीत. लेखी परिक्षा दि. 30/07/2023 (रविवार) रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 यावेळेत प्रवेशपत्रात नमूद करण्यात आलेल्या ठिकाणी होईल, परिक्षेनंतर लगेचच प्राथमिक उत्तर तालिका प्रसिध्द करण्यात येईल, सदर उत्तरतालिकेवर परिक्षा केंद्रावर किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे आक्षेप दाखल करता येतील, त्याच दिवशी सायंकाळी 05.00 वाजता अंतिम उत्तर तालिका (Final answer key ) प्रसिध्द करण्यात येईल.
लेखी परिक्षेतील गुणवत्ता क्रमांकानुसार पात्र उमेदवारांची अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्पुरती गुणवत्ता यादी दि.01/08/2023 (मंगळवार) रोजी उपविभागीय कार्यालय भूम व तहसिल कार्यालय परंडा येथे प्रसिध्द करुन, दि. 03 (गुरुवार) व दि. 04/08/2023 (शुक्रवार) रोजी मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. अंतिम निवड यादी दि.07/08/2023 (सोमवार) रोजी प्रसिध्द करण्यात येईल