
दैनिक चालू वार्ता
तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण
गोविंद मोरे
झोन क्र.२ श्रीराम ताजनगर,हीगोली नाका येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यी संख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना बसण्यास जागा अपुरी पडत असुन अतिरिक्त अंगणवाडी खोली उपलब्ध करून देण्यात यावी मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महीला सेनेच्या वतीने महीला व बालविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले… त्यावेळी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्षा सौ.उषाताई नरवाडे, जिल्हा उपाध्यक्षा सौ.प्रेमीलाताई हनमंते, उपाध्यक्ष पप्पु सोनटक्के,शहर उपाध्यक्ष हनुमान जाधव पाटील,शहर उपाध्यक्ष (उत्तर) शंकर चाकोते, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे शहराध्यक्ष प्रेमदास वळसंनकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…..🚩*