
दै.चालू वार्ता
कंधार ग्रामीण प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
गंगापूर:-श्री शिवाजी विद्यालय, रांजनगांव (शे.पू.), ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर येथे दि. २६ जुलै 2023 बुधवार स. ११ वा. शाळेत मातोश्री मुक्ताईची पुण्यतिथी व विजयी कारगील दिन साजरा केला.प्रारंभी
छ. शिवाजी महाराज,मातोश्री मुक्ताई,डॉ. केशवराव धोंडगे यांच्या प्रतिमेची पूजन अध्यक्ष श्री धारूळे सर, श्री.प्राचार्य मिरकुटे सर,प्रमुख उपस्थिती व्याख्याते श्री सुरेश घोरबांड, श्री होनराव सर हे होते.शालेय विद्यार्थ्यांनी मातोश्री मुक्ताई यांच्या जीवनपटावर व कारगील दिनाचे महत्व यांवर भाषणे झाली. शाळेतील अनाथ व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत युनीफॉर्म देण्यात आला. त्यानंतर व्याख्याते श्री सुरेश घोरबांड गुरुजी यांनी मातोश्री मुक्ताईच्या जीवनावर बोलताना म्हणाले की निझामाच्या काळात, शैक्षणिक,धार्मिक कार्य खूप अवघड होते. पण अज्ञानरूपी समाजाला ज्ञानी करण्याची जिद्ध मातोश्री अंगी होती म्हणून आपल्या बाळ केशवांनी गरिबांच्या लेकरांसाठी काही शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे असा विचार दिला आणि केशवराव धोंडगे यांनी ते साकार केले.आजच्या मुलींनी मातोश्री मुक्ताई वसा घेऊन कार्य करावे, मुलांनी डाॅ.केशवराव धोंडगे यांच्यासारखे राष्ट्र समाजपयोगी कतृत्व करावे असे म्हणाले.त्यानंतर श्री मिरकुटे सर आणि श्री होनराव यांचे मार्गदर्शन झाले.शेवटी अध्यक्षीय समारोप श्री अनिल धारुळे यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन अनिल भांड यांनी केले.राष्ट्रगीत व आदरांजली वाहून कार्यक्रम संपन्न झाला.