
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – दि. २५.०७.२०२३ रोजी, कोकण उन्नती मित्र मंडळ मुंबईचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य महाविद्यालय आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा-रायगड येथे संस्थेचे अध्यक्ष श्री.मुश्ताक अंतुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांसाठी ग्राहक जागृती आणि वित्त व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन संपन्न करण्यात आले. श्री.मुश्ताक अंतुले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थांसाठी सातत्याने अनेक उपक्रम राबविले जातात. नुकतेच महाविद्यालयाला NAAC बेंगलोर यांच्याकडून बी प्लस प्लस मानांकन मिळालेले आहे. सदर कार्यशाळा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. दिगंबर टेकळे यांच्या अध्यक्षतेत भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक जागृती व संरक्षण तसेच वित्त व्यवस्थापन याविषयांवर तीन तुकड्यांत आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ग्राहक जागृती व संरक्षण याविषयावर भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या श्रीम. मिलन मेस्त्री यांनी तर वित्त व्यवस्थापन या विषयावर श्रीम. अर्चना भिंगारडे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली . सदर कार्यशाळेत १४२ विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोदवीला. या कार्यशाळेत ग्राहकांची होणारी फसवणूक त्यावरील उपाययोजना, ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकपाल, तसेच वित्त व्यवस्थापन व गुंतवणूक, गुंतवणूकीचे फायदे, भाग बाजार, नाणे बाजार अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देवून प्रमाणित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कानिफ भोसले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुमित चव्हाण यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात वाणिज्य विभागाचे प्रा. एम. एस. जाधव, प्रा. एस. एस दुंडे, प्रा. जगदिश शिगवण, एस. सी. समेळ, प्रा. एम. एच. सिद्दीकी, प्रा. डाॅ. संजय बेंद्रे, प्रा. सलमा नझीरी, प्रा. आतिका नझीरी, हे उपस्थित होते.