
दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
एक रुपयात मिळणार खरीप पिक विम्याचा लाभ
खरीप हंगाम २०२३-२४ पासून शासनाने पिक विमा योजना लागू केली असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज फक्त एक रुपया भरावयाचा आहे एक रूपया वगळता उर्वरित विमा हप्त्यांची शेतकरी हिश्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे सदर योजना ही २०२३-२०२४ पासून २०२५-२६, या तीन वर्षासाठी राबविण्यात येणार आहे
पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे पिकांचे नुकसान ,पीक पेरणी पासून काढणीपर्यंत नैसर्गिक आग वीज कोसळणी गारपीट चक्रीवादळ पुरक्षेत्र ,भूखनन ,दुष्काळ पावसातील खंड कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादीमुळे उत्पन्नात होणारी घट वरील कारणामुळे नुकसान होऊन पीक उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा लागू होईल रायगड जिल्ह्यातील सदरची योजना चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे विमा योजनेत सहभागासाठी पिक विमा पोर्टल १ जुलैपासून कार्यान्वित झालेली आहे या योजनेत सहभागासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी म्हसळा श्री राजेंद्र ढंगारे यांनी केले आहे करिता सर्व शेतकऱ्यांनी कॉम्प्युटर सेवा केंद्राशी संपर्क साधून खरीप पिक विमा काढून घ्यावा .
अधिक माहिती करीता तालुका कृषी अधिकारी म्हसळा यांचे कार्यालयातील अधिकारी तथा कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा
श्री राजेन्द्र ढंगारे प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री एस एन कुसळकर कृषी पर्यवेक्षक मसळा १.
श्री आर बी मगर कृषी पर्यवेक्षक म्हसळा २
श्री जी पी देवडे कृषी सहाय्यक आंबेत
श्रीमती के पी शेळके कृषी सहायक म्हसळा
श्री डी. पी सरनाईक कृषी सहायक काळसुरी
श्री ए.एम.सान