
दै.चालू वार्ता नांदेड
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कै. माधवराव पाटील कस्तुरे (गुरुजी ) व कै. प्रा. हरिदास कवडे संस्थापक – सचिव तथा श्री शिवाजी विद्यालय बारूळ चे ते माजी उप प्राचार्य यांच्या जयंती निमित्ताने सन 2020 – 21 , 2022 – 23 , 2023 या चार वर्षासाठी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन 30 जून 2023 रोजी करण्यात आले असून याच कार्यक्रमांमध्ये 2022- 23 वर्षासाठीचा कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण सुद्धा मान्यवराच्या शुभ हस्ते होणार आहे. . गुणवंताच्या गुणगौरव सत्कार सोहळा व कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारा वितरण सोहळा या दोन्ही कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री भगवानराव गणपतराव राचेवाड ( अध्यक्ष – नांदेड जिल्हा कलेकुडगी समाज संघ ) राहणार असून या कार्यक्रमास प्रमुख वक्ते मा. श्री आनंदराव कर्णे हे राहणार असून प्रमुख उपस्थिती मा. श्री एच.व्ही.आरगुंडे ( उद्योजक पुणे ) मा.श्री अशोकराव ईरण्णा पिल्लगोंडे उद्योजक पुणे ) , मा. श्री सुरेशराव रामराव इटकापल्ले ( उद्योजक मुंबई ) इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून नांदेड जिल्ह्यातील गुणवंतांनी व पुरुषनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान नांदेड जिल्हा कुलेकडगी समाज संघ नांदेड च्या वतीने करण्यात आले आहे. . कार्यक्रमाचे स्थळ रविवार दिनांक 30 /07/2023 रोजी सकाळी ठीक 11 : 00 वाजता शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे सर्व पालकांनी आपापल्या पाल्यांना सोबत घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे…