
जालना प्रतिनिधी आकाश माने
अवैध धंदेचालक आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले
जालना शहरातील प्रमुख पोलिस ठाणे असलेल्या सदर बाजार पोलिस ठण्याच्यावतीने हद्दीमध्ये बुलेट पेट्रोलिंग सुरू करण्यात आली. नवनियुक्त पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी नुकताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार घेतला असून त्यांनी आजपासून बुलेट पेट्रोलिंग हा नवा उपक्रम सुरू केला आहे. पोलिस जीपच्या माध्यमातून शहरात पेट्रोलिंग तर केलीच जाते मात्र गल्ली बोल्यातून जीप जाणे शक्य नसल्याने बुलेटच्या माध्यमातून हद्दीतील कानाकोपऱ्यात पेट्रोलिंग करणे शक्य होणार आहे. सदर बाजार पोलिसांच्या या बुलेट पेट्रोलिंग मुळे अवैध धंदे चालक आणि गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले असून सामान्य नागरिकांमधून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
असा होता पेट्रोलिंगचा रुट
मोदीखाना, पेन्शनपुरा, कॉलेज रोड, ख्रिस्ती कॅम्प, डॉ. फेजर बॉईज स्कूल, आझाद मैदान , रामनगर, शिक्कल्करी मोहल्ला, मंगळ बाजार, चमडा बाजार, गांधी नगर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, पाणीवेस, सुभाष चौक, संग्राम नगर, भोकरदन नाका, बस स्टँड, जुना मोंढा, रहेमान गंज.
दारुडे आणि रोडरोमियोना चोप
या बुलेट पेट्रोलिंग दरम्यान आझाद मैदान आणि जुना मोंढा परिसरात दारू पित बसलेले दारुडे पोलिसांना पाहून सैरावैरा पळू लागले. या दारुड्या आणि रोड रोमियांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला.
हद्दीतील प्रत्येक गल्ली बोळात बुलेटच्या माध्यमातून सशस्त्र पोलिसांची पेट्रोलिंग केल्याने अवैध धंदे चालक आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी हा बुलेट पेट्रोलिंग मागचा उद्देश आहे…