
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (चांदूरबाजार): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकतीच चांदूरबाजार तहसील कार्यालय येथे भेट देऊन विविध विभागाच्या कामाची पाहणी केली.सोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा सुद्धा उपस्थित होते.
तहसील कार्यालयातील विविध विभागांना जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी भेटी दिल्या व प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.त्यानंतर चांदूरबाजार बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथील पुलाच्या बांधकामास भेट देवून उपविभागीय अभियंता यांना आवश्यक सुचना दिल्या.तसेच पुर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी,कर्मयोगी गाडगेबाबांची कर्मभूमी नागरवाडी,आश्रमशाळा आणि कलादालनास भेट दिली.अचलपूरचे उपविभागीय अधिकारी,चांदूरबाजार तहसीलदार,नायब तहसीलदार,कार्यकारी अभियंता,उपअभियंता कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.