
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा- दि.२८ राज्य व केंद्र सरकार ची शेती व शेतकर्यांबदद्ल अनास्था असून शेती व शेतकरी देशोधडीला लागले आहेत . वाढत्या माहगाई बरोबर शेतमालाचे भाव त्या पटीत वाढत नसल्याने व सरकारचे धोरण हे शेतकरी विरोधी असल्याने शेती डबघाईला आली असून शेतकरी आत्महत्या करत आहेत . हे दिवस बदलण्यासाठी शेतकर्यांना जागृत करणे गरजेचे आहे त्यामुळे मा खा राजू शेट्टी साहेबांच्या आदेशाने
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वतीने
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जन जागृती अभियान उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. आज श्री काळ भैरवनाथ गुरु गादीचे महंतपीर शामनाथ महाराज यांचे हस्ते श्री भैरवनाथ चरणी श्रीफळ फोडून या अभियानास सोनारी येथुन सुरुवात झाली . यावेळी रविंद्र इंगळे – जिल्हाध्यक्ष , बिभीषन भैरट सर उच्चाधिकार समिती सदस्य , ईश्वर गायकवाड संपर्क प्रमुख , तानाजी पाटील – जिल्हा पक्षाध्यक्ष , परंडा तालुका अध्यक्ष शंकर घोगरे,
रामेश्वर नेटके ता पक्षाध्यक्ष
, शिवाजी ठवरे ता युवाध्यक्ष , मा उप सरपंच अंगद फरतडे,नितीन गाढवे
, विलास खोसरे ,सुनील गुळमीरे,
भारत वायकर , भारत ईटकर, धनाजी पेंदे , गुरुदास भोजने
, राजाभाऊ हाके , भूम तालुका अध्यक्ष अमृत भोरे, ह भ प परमेश्वर घोगरे, बिभीषण काशीद
यांचे सह स्वभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी अंबी पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री हंगे यांचे मार्गदर्शनाखाली पी एस आय बाळासाहेब होडशीळ यांचे सह . मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता…