
दैनिक चालु वार्ता
किशोर फड प्रतिनिधी बीड परळी
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्घटना घडल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा न करता “ईरशाळवाडी” या गावाच्या उभारणी करण्याकरीता सहकार्य करावे हे आवाहन केले होते.*
परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रायगड जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त “ईरशाळवाडी” गावाच्या उभारणीसाठी १० लक्ष रुपयाचा सहाय्यता निधीचा धनाकर्ष सुपूर्द!!
रायगड जिल्ह्यातील “ईरशाळवाडी” येथे दरड कोसळून आपले अनेक बांधव मृत्युमूखी पडले होते.ईरशाळवाडी गावाच्या नव्याने उभारणी करण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांना १० लक्ष रुपयाचा निधी परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला यावेळी विधिमंडळ येथे बीड जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांनी रायगड जिल्ह्यातील दुर्घटना घडल्यामुळे त्यांचा वाढदिवस साजरा न करता “ईरशाळवाडी” या गावाच्या उभारणी करण्याकरीता सहकार्य करावे हे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच परळी नगर पालिकेचे गटनेते श्री वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसने १० लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देतेवेळी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब सोबत मा.आ. श्री संजय भाऊ दौंड,बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री राजेश्वर आबा चव्हाण, श्री राजपालजी लोमटे , श्री राजकिशोर पापा मोदी, राष्ट्रवादी अंबाजोगाई तालुकाध्यक्ष श्री तानाजी भैया देशमुख ,भैया धर्माधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.