
सोबतच घडले हिंदू-मुस्लिम ऐक्क्याचे दर्शन…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा तसेच परंपरेनुसार चालत आलेला मोहरम उत्सव मौलाजी देवाचा ओटा संस्थान मौला अली दर्गा रजि.नं.A२७२१ अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
अंजनगाव सुर्जी शहरातील मौला अली बाबा दर्गा येथे ढोल-ताशासह मौला अली बाबा सवारी मिरवणूक काढण्यात आली होती.हिंदू-मुस्लीम ऐक्क्याची सामाजिक सलोखा जपणारी परंपरा कायम ठेवत दरवर्षी प्रमाणे या मोहरम उत्सवामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडले.मोहरम या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या सणाला कुठलेही गालबोट न लागावे करिता यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला…
मोहरम हा दुःखाचा महिना मानला जातो.सिया समुदायाचे लोक या महिन्यात नवव्या व दहाव्या दिवशी रोजा ठेवतात.मोहरम मध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन यांच्यासह कर्बलाच्या लढाईत शहीद झालेल्या ७२ शहिदांची शहादत आठवून शोक व्यक्त केला जातो आणि शेवटच्या दिवशी मौला अली बाबांची मिरवणूक काढून श्रद्धांजली अर्पण केल्या जाते.