
दै.चालु वार्ता
ता.प्रतिनिधी चिखलदरा
प्रवीण मुंडे
अमरावती (चिखलदरा) : दिसोमचे देशभरातील फेलो गेल्या मागील आठवड्याभऱ्यापासून मेळघाट दौऱ्यावर असून परसापुर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ठोकबर्डा येथील रहिवासी बलदेव राजने यांच्या राहत्या घरी एक चालत फिरत विद्यापीठ म्हणजे दिसोम मार्फत विद्यार्थ्यांकरिता वाचनालय सुरू करण्यात आले.या वाचनालयाचे उद्घाटन दिसोम कोअर टीमचे सदस्य बिरेन भुटा व काटकुंभचे सरपंच ललिता बेठेकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
भविष्यात विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून समाजहीताचे कार्य करावे आणि आपापल्या जीवनात लोकशाही,नैतिकता जोपासावी. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना साहित्य सहज उपलब्ध व्हावेत आणि जास्तीत-जास्त मुला-मुलींना वाचनालयाचा उपयोग व्हावा जेणेकरून जगाचे ज्ञान त्यांना सहज गावात राहून उपलब्ध होईल.करिता सर्वांसाठी मोफत असे वाचनालय सुरू करण्यात आले.यामध्ये शहरी,ग्रामीण,राजनैतिक,आत्मकथा कादंबरी,कविता अशा सर्व प्रकारची पुस्तके त्या वाचनालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील अशी माहिती बलदेव राजने यांनी दिली.