
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद: भूम तालुका कोतवाल संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,कोतवाल संघटनेचे विभागीय अध्यक्ष सोमनाथ गवळी, जिल्हा कार्याध्यक्ष संपत माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.येथील भू म तालुका कोतवाल संघटनेची नूतन कार्यकारिणी गठीत केली असून तालुकाध्यक्षपदी सुधीर काळे तर उपाध्यक्षपदी नवनाथ माळी, तालुका कार्याध्यक्षपदी रेश्मा साबळे यांची निवड झाली. जिल्हा उपाध्यक्षपदी अरुण जाधवर यांची निवड झाली आहे. यावेळी कोतवाल संघटनेचे राहुल कलाल, विलास जानकर, श्रीकांत गजरे, माजी उपसभापती रामकिसन गव्हाणे, उद्योजक काका बोराडे, युवा नेते संदीप नाईकवाडी, डॉ. आकाश भोसले, रामभाऊ बागडे, रामभाऊ आकरे,श्रीकांत गोरे, अस्लम शेखदार, सलीम शेख, प्रमिला पालके, रोहिणी टकले, रोहिणी साबळे, चक्रधर सस्ते, अमोल कदम, युवराज पवार, शरद नागटिळक, विक्की माळी, सूर्यकांत कोळी, श्रीमंत जाधव, भारत गायकवाड, कमलाकर माने, सतीश घुले यांच्यासह कोतवाल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.