
दै.चालु वार्ता
नांदेड प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड शहरातील शैक्षणिक दृष्ट्या अव्वल स्थानी असलेल्या शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड च्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. विद्यावती शांतय्या स्वामी ह्या 31 जुलै 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. .सौ. विद्या स्वामी यांचा जन्म 06 जुलै 1965 रोजी झाला असून त्यांनी 1988 मध्ये डी.एड. ही पदविका उत्तीर्ण झाल्यानंतर 1989 ते 19 जुलै 1993 पर्यंत अंबिका विद्यालयात नोकरी केली असून पाचवी व सहावी वर्गाचे अध्यापन त्यांनी केले आहे पुढे शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड येथे 20 जुलै 1993 रोजी जॉईन झाल्यापासून तीस वर्षाच्या कालावधीनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती पर्यंतच्या कालावधीपर्यंत सौ विद्या स्वामी यांच्याकडे सतत अध्यापनासाठी पहिल्या वर्गाचे विद्यार्थी असायची व पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या एवढ्या रममान होत असायच्या की ते स्वतःचे घरदार , मुलेबाळे सर्व विसरून विद्यार्थी आपले दैवत आहेत विद्यार्थ्यांना लेखन व वाचन करता आले पाहिजे व विद्यार्थ्यात शिस्त निर्माण झाली पाहिजे अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून सतत त्यांनी स्वतःला सेवेत सामावून घेतले होते. त्यांच्या अंगी विद्यार्थ्याप्रति विशिष्ट आस्था व निष्ठा तसेच दयाळूपणा मायाळूपणा कनवाळूपणा इत्यादी गुणा सह मातृत्व आणि दातृत्व त्यांच्या अंगी ठासून भरलेला होता त्यांच्याकडे पहिल्या वर्गात ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची विद्यार्थ्याविषयी असलेली काळजी पूर्णतः नाहीशी झालेली दिसून येत कारण सौ. विद्या स्वामी यांनी त्या विद्यार्थ्याप्रती आईचं आई पण , बाईचं बाई पण ,वडिलांचे वडील पण सुद्धा स्वीकारून विद्यार्थ्याला घडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आजही त्यांच्या हाताखाली शिकून गेलेल्या तीस वर्षाच्या काळातील शेकडो विद्यार्थ्यांचे व पालकांचे सतत संपर्क होतात व बरेचसे विद्यार्थी मोठ्या पदावर नोकरीला गेलेले आहेत यातच त्यांच्या अध्यापनाचा गुपित दडलेला आहे हे सिद्ध होतं असा सूर आजी-माजी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या तोंडून ऐकावयास मिळतो. .तीस वर्षाच्या त्यांच्या प्रामाणिक सेवेतील कार्यकाळात माजी मुख्याध्यापक चीटमलवार सर हे अतिशय शिस्तीचे असल्यामुळे त्यांच्याकडून शिस्तीचे धडे पण मला मिळाले तसेच यांच्यासह सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शेंदारकर मॅडम यांच्यासह मुख्याध्यापक दुगाळे सर यांचेही सहकार्य अतिशय चांगले लाभले तसेच माझ्या शाळेतील सर्व श्री कल्याणकर सर यांच्यासह सर्वच सहकारी स्टाफ चे सुद्धा तीस वर्षाच्या काळातील सहकार्य तेवढेच अनमोल असून तो ठेवा कायम मी माझ्या पुढील आयुष्यात जपणार आहे. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त तर सर्वांनाच व्हावे लागते परंतु सेवानिवृत्तीचा विचार मनात येतात विद्यार्थ्यांप्रती आस्था व निष्ठा असणारी एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका 31 जुलै 2023 पासून महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड पहिल्या वर्गात , कार्यालयात व शाळेच्या प्रांगणात व विद्यार्थ्यांच्या मध्ये येऊ शकणार नाही याची खंत मनात सतत राहणारी असून याच्या एवढे मोठे दुःख दुसरे माझ्यासाठी कोणतेच नाही अशी भावना सौ.विद्या स्वामी यांनी व्यक्त केली परंतु नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त जरी मी होत असले तरी शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड व महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड आणि माझे सर्व सहकारी व विद्यार्थी यांच्यासोबत जी माझी नाळ जोडलेली आहे ती कायम पुढे सुद्धा अशीच टिकून राहील याची मी काळजी घेणार आहे अशी भावना सौ.विद्या स्वामी यांनी व्यक्त केली. .सौ.विद्या स्वामी या विद्यार्थी प्रिय शिक्षिका नियत वयोमानानुसार तीस वर्षाच्या प्रामाणिक सेवेनंतर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संस्थेचे दिग्गज मान्यवर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब , माजी मंत्री डी.पी.सावंत साहेब, अमिता भाभी चव्हाण नरेंद्र दादा चव्हाण तसेच आजी माजी मुख्याध्यापक सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तथा पालक या सर्वांनी सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या असून सौ विद्या स्वामी यांचे पुढील आयुष्य आनंदी व सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाओ तसेच निरोगी राहो अशी सदिच्छा व्यक्त केली व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.