
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-भूम शहरातील शिव शंकर नगर युवा बचत गटाची पाचवी वार्षिक सभा विश्वकर्मा मंदिर शिव शंकर नगर येथे पार पडली. शिव शंकर नगर युवा बचत गटाला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे बचत गटाच्या वतीने पाचवा वार्षिक अहवाल व धनादेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मा.नगराध्यक्ष विकासरत्न संजय गाढवे यांच्या हस्ते धनादेश व अहवाल सर्व सदस्यांना वितरीत करण्यात आले.त्याच बरोबर त्यांनी सर्व सदस्यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी वारे वडगाव चे उपसरपंच दत्ता नलवडे, युवा उद्योजक बाळासाहेब अंधारे ,गटाचे अध्यक्ष बालाजी राऊत , सचिव रवींद्र कुंभार , कोषाध्यक्ष दादासाहेब राऊत , सुजीत जरडकर ,गटाचे सल्लागार अँड. मोगल साहेब , शैलेश रेपाळ, रमजान शेख, शरद सासवडे, गणेश जरडकर ,भाऊसाहेब चोथवे,कृष्णा भोरे ,अजय लोंढे, अधिराज पवार, सुनिल कदम,दतात्रेय वाळके,बांधकाम विभाग सेवा निवृत्त कर्मचारी किसन राऊत ,विलास यादव ,माधव माने,लक्ष्मण सुपनर , उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दादासाहेब राऊत यांनी मानले.