
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा दवणे
मंठा :- जालना जिल्ह्याचे भूमीपुत्र काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे प्रतोद , आमदार राजेश राठोड यांनी विधानपरिषदेमध्ये भामटा राजपुत समाजातील बोगस लाभार्थ्यांनी घेतलेल्या जात प्रमाणपत्राबाबत विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्याबद्दल महाराणा युवा मंच वाळुज (व्हाटसअॅप ग्रुप) व करणी सेनेच्या पदाधिकाऱ्याकडून येत असलेल्या धमक्या बाबत प्रशासनास निवेदन देवून उच्च स्तरीय सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे कि विधान परिषदेमध्ये आमदार राजेश राठोड यांनी राज्यातील राजपुत भामटा या समाजातील काही लाभार्थ्यांनी राजपुत भामटा या जातीचे बोगस प्रमाणपत्र काढले आहेत या बाबत चौकशी होणे करिता प्रश्न उपस्थित केला होता.
आमदार राजेश राठोड यांनी सदरील प्रश्न उपस्थित का केला म्हणून म्हणून काही करणी सेनेचे पदाधिकारी यांनी आमदार राजेश राठोड यांना व्हाॅटसॲप ग्रुप च्या माध्यमातुन धमकी देणे, सामाजिक प्रसिध्दी दृवारे तुमचा जाहीर निषेध केल्या जाईल व महाराष्ट्रात कोठेही फिरु दिल्या जाणार नाही अशा धमक्या महाराणा युवा मंच वाळूज या (व्हाटसअॅप ग्रुप) मिडीयाच्या माध्यमातून दिल्या आहेत. वास्तविक पाहता सदरील प्रश्न हा कोण्या जाती विषयक नव्हता ज्या काही लोकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस प्रमाणपत्र काढले आहे त्यांची चौकशी करण्यात यावी असा प्रश्न आमदार राजेश राठोड यांनी उपस्थित केला होता त्यावर करणी सेना, महाराणा युवा मंच ग्रुप आमदार राजेश राठोड यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी धमकी दिल्या आहेत.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेवून आमदार राजेश राठोड यांना उच्च स्तरीय सुरक्षा देवून दोषी विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.या निवेदनावर वसंतराव जाधव ( जेष्ठ नेते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) दौलतराव जाधव ( मा.चे.वि .का.स.सो ) सचिन दादा राठोड ( संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती मंठा) यांच्या सह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते,व नागरिक आदींच्या सह्या आहेत.