खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर :देगलूर शहरातील तळ गल्लीतील नगरेश्वर संस्थान मंदिर समोरील एका बड्या व्यापाराचे घर बांधकाम साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्यामुळे या भागातील नागरिकांना अंतर्गत रस्त्यावर चालणे झाले दुरापस्त तसेच खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे . सात आठ महिन्यापासून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे पालिका प्रशासन काय तरी करीत आहे असा संतप्त सवाल या गल्लीतील नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
तळ गल्लीत भाजीपाल्याचा बाजार दर दिवस भरत असतो. त्यामुळे साहजिकच या भागात नित्याचीच मोठी वर्दळ असते. दिवसातून अनेकदा या भागात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याच परिसरात नगरेश्वर संस्थान मंदिर समोर वट्टमवार या नामक व्यक्तीने घराचे बांधकाम काढले आहे. नगरपालिकेकडून बांधकाम परवाना घेऊन सात महिन्याचा कालावधी उलटला तरी या महाशयाने फक्त पीलर उभारण्यासाठी मोठ मोठे खड्डे खोदून ठेवले आहे सदरील खड्डे रोड लगत आहेत आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या खड्ड्यात पाणी साचले आहे परिणामी कोणतेही वाहन या रस्त्यावरून ये जा करीत असताना त्या खड्ड्यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच सदरील घर बांधकामाचे साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकून संपूर्ण रस्ता ब्लॉक केला आहे त्यामुळे शेजारील नागरिकांना अंतर्गत रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी तर सोडाच पायी चालणे देखील झाले दुरापस्त आहे.
राजकीय पाठबळाच्या जोरावर वट्टमवार हा कोणासही न जुमानता आपलीच मनमानी करीत रस्ता आपल्याच बापाचा आहे अशा अविर्भावात वावरून तो रस्ता पूर्णता व्यापला आहे.
अशा मुजोर घर मालकावर नगरपालिका प्रशासन सार्वजनिक रस्त्यावर घर बांधकामाचे साहित्य व पिलर उभारणीसाठी केलेले खड्डे हे सर्वसामान्य नागरिकास धोका निर्माण करणारे आहे अशा सदरात मोडणाऱ्या कलमाद्वारे कारवाई करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
कारवाई करण्यास नगरपालिका कुचराईचे धोरण राबविल्यास येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिला आहे
