
दैनिक चालू वार्ता
उप संपादक उस्मानाबाद
नवनाथ यादव
उस्मानाबाद:-साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती तालुका सह ग्रामीण भागात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. तालुक्यातील पात्रुड येथे प्रथमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे.अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.यावेळी विनोद साठे, ठाकरे गट उपजिल्हाप्रमुख चेतन बोराडे, संतोष विटकर , सागर साठे , सतिष पौळ , प्रदीप साठे , विकास साठे , समाधान साठे , सचिन साठे , श्रावण तुपसमिंन्दर , हनुमंत पौळ , गणेश वीर , संदेश वाळके , शाम पौळ , नारायण पखाले , विशाल साठे ,रोहन पोळ, विनोद पोळ, बापू साठे,बाजीराव साठे, दिलीप पोळ अनिल पोळ, शिवाजी पोळ,रघुनाथ पोळ यांच्यासह इतर युवक समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उप- स्थित होते.