
दैनिक चालू वार्ता
हिमायतनगर प्रतिनिधी राम चिंतलवाड
नांदेड – हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे आज दिनांक १ आॅगष्ट २०२३ रोजी सकाळी ठिक १० वाजता साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सागराचे पाणी कधी आटणार नाही. अण्णा भाऊंची आठवन कधी मिटणार नाही,अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी, आपल्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चे उपकार कधी फिटणार नाही, असे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे सर्व प्रथम पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. त्यानंतर दिघी येथील पोलीस पाटील आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय दिघी येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सर्व प्रथम ग्रामपंचायत सरपंच सौ.छाया गायकवाड यांच्या हस्ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित गावातील पोलीस पाटील विलासराव कदम, ग्रामपंचायत सरपंच सौ.छाया बंडु गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय घुटे, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णाजी वानखेडे, विश्वासराव वानखेडे, शेषराव कदम, शालेय समितीचे अध्यक्ष संभाजी शिरफूले, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड, संभाजी गायकवाड, गणपत गायकवाड, मारोती गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, बंडु गायकवाड, शिवाजी गायकवाड,राजु गायकवाड, गजानन पोतरे, अर्जुन गायकवाड, ओमकार गायकवाड, आदर्श गायकवाड, दत्ता गायकवाड, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.