
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार) :- कंधार तालुक्यातील कळका येथे कै.प्रा.रामचंद्र शंकरराव गायकवाड पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरणा निमित्त दि.१९ आॅगस्ट रोज शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्थळ :- सुभाषराव पाटील विद्यालय कळका येथे कळकेकर परिवार व आधार हाॅस्पिटल नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती व वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील वाघमारे , डॉ. मारोती लाठकर , डॉ.स्वप्नील कदम , डॉ. रमा कदम डॉ. श्रृतीका , डॉ . रेणूका , डॉ. नेहा , डॉ .गादेकर , डॉ. ज्ञानेश्वर गायकवाड , ही तज्ञ मंडळी उपस्थित राहून रूग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करणार आहेत.याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत.तरी परिसरातील गरजू रुग्णांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती रूक्मिणबाई रामचंद्र गायकवाड ,डाॅ.संजीवकुमार रामचंद्र गायकवाड पाटील,सौ. मंजुश्री सुभाषराव तिवडे ,सौ.डाॅ. श्रृती संजीवकुमार कळकेकर , सौ.दीपा विरेंद्र कळकेकर , समस्त गायकवाड पाटील कळकेकर यांनी केले आहे.