
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर):शेटफळ हवेली येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने इंन्द्रेश्वर मेडीकल रिसर्च फाउंडेशन इंदापूर व माऊली निंबाळकर मित्र परिवार शेटफळ हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १९ ऑगस्ट २०२३ रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली, ज्येष्ठ नागरिक संघ ऑफिस या ठिकाणी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
यामध्ये मोफत नेत्र तपासणी, कान,नाक,घसा, अस्थिरोग व हृदयरोग निदान तपासणी व पुढील उपचारासाठी मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. (S.F.S) बुधराणी हॉस्पिटल कोरेगांव पार्क पुणे यांच्यावतीने संपूर्ण डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये डॉ.सचिन बाळकृष्ण शिर्के अकलूज प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ, डॉ. सुहास शेळके कान, नाक, घसा तज्ञ, डॉ.सुधीर तांबिले नेत्र तज्ञ, डॉ. सचिन बिचुकले अस्थिरोग तज्ञ, त्याचबरोबर शेटफळ हवेली गावचे सुपुत्र डॉ. अनिल शेळके पुंडे अस्थिरोग तज्ञ या नामवंत डॉक्टरांचा सहभाग होणार आहे.
या शिबिरासाठी विशेष सहकार्य इंद्रेश्वर मेडिकल रिसर्च फाउंडेशन इंदापूर यांनी केले आहे. तरी या शिबिराचा शेटफळ हवेली व पंचक्रोशीतील नागरिकांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन युवा प्रतिष्ठान व माऊली निंबाळकर मित्र परिवार शेटफळ हवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे.