
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड(देगलूर): देगलूर शहरातील विविध शाळा व कॉलेजच्या समोर रोड ‘रोडरोमिओं’ची वर्दळ वाढली असून शाळा, कॉलेज भरण्या सुटण्याच्या कालावधीत त्यांच्या गाड्या सुसाट धावू लागल्या आहेत. मुलींचा पाठलाग करणे, हॉर्न वाजवत मुद्दामच गर्दीतूनही गाड्या पळवणे, लगट करणे, छेडछाड करणे, लागेल असे बोलणे अशा विविध कारनाम्यांनी महाविद्यालयीन तरुणी व काही शाळकरी मुली त्रस्त आहेत. असुरक्षितता व भीतीने त्या अस्वस्थ होत आहेत.
जुना बसस्थानक येथून जाणाऱ्या देगलूर महाविद्यालय,वै.धुंडा महाराज महाविद्यलय, सिंधु कॉलेज, साधना हायस्कुल,मानव्य विकास विद्यालय, सावित्रीबाई फुले शाळा, प. पू. गोळवणकर गुरूजी शाळा, सप्तगिरी पोद्दार लन्स स्कूल ,पुजा पब्लिक स्कुल, महात्मा फुले इंग्लिश स्कुल, ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कुल, अशा शिक्षणाची विविध दालने आहेत. त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मुली शिक्षण घेत आहेत. परिसरातील सुमारे २५ गावांतील एक हजारांवर शाळकरी व महाविद्यालयीन मुली त्या शिक्षण संकुलात दररोज ये- जा करतात. तसेच खेड्यापाड्यातून, वाड्या-वस्त्यांवरून टायपिंग कोर्ससह विविध क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींची संख्याही मोठी आहे…
बहुतांशी मुली एसटी बसनेच ये-जा करतात. येथील साठे चौक, जुना बस स्थानक येथे बसमधून उतरून त्यांना कॉलेजकडे किंवा विद्यालयाकडे जावे लागते. त्यासाठी शिक्षण संकुलापर्यंत सुमारे एक ते दिड किलोमीटरचीपायपीट करावी लागते. शाळा कॉलेजला ये-जा करताना त्यांना ‘रोडरोमिओं’च्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कधी सुसाट वेगाने कसरत करीत बिना वाहन परवाना चे गाड्यांवरून तरुण फेऱ्या मारत असतात. तर गर्दीतून मुद्दाम मोठमोठ्याने हॉर्न वाजवत गाडी घासून नेली जाते. कधी भाईगिरी करीत तर कधी वेगवेगळ्या कलागती करीत तरुणींचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दुर्लक्ष केले तरीही अनेकदा लज्जास्पद वा चीड निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात येतात. कधीकधी काळजाचा ठोका चुकेल, अशा भीतीदायक शब्दांचा वापर करण्यात येतो आहे. कॉलेज सुटल्यानंतर बस स्थानकापर्यंत टोळकी मुलींचा पाठलाग करतात. बस स्थानकातही विनाकारण रोड रोमिओ फेऱ्या मारत असतात. त्यामुळे काही शाळकरी, महाविद्यालयीन तरुणी भयभीत झालेल्या होत आहेत. त्यांना असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे पालकही त्यांना कॉलेजला पाठवत नसल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक तरुणींचे कॉलेजला येणे बंद झाले आहे. महाविद्यालयातील मुलींच्या दैनंदिन उपस्थितीत कमालीची घट झाली आहे. मात्र, त्याची फारशी वाच्यता होताना दिसत नाही. पोलिसांनी अशा टोळक्यांवर, कॉलेज व शाळा रोडने वारंवार फेऱ्या मारणाऱ्या, अकारण तेथे घुटमळणाऱ्या रस्त्याने मस्ती करीत गाडी सुसाट चालवणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसलेले अनेक तरुण, तसेच शहरात अल्पवयीन मुलं टू व्हीलर गाड्या चालवत असतानाही भरपूर प्रमाणात दिसत आहेत.शाळकरी मुलेही गाड्य वेगाने फिरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. आशा या रोडरोमिओ चा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने चिडीमार पथकाची स्थापना करून कार्यावित करावी अशी देगलूर शहरातील जनते मध्ये बोलले जाते.