दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड (देगलूर): तालुक्यातील जि. प. शाळा खानापूर येथे शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून वेळेवर विषय शिक्षक दिले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकून आंदोलन केले होते त्या बातमीची दखल दैनिक चालू वार्ता पेपरने काही दिवसापूर्वी बातमी लावली होती याच बातमीची दखल घेऊन . जि.प. शिक्षण विभागाने इंग्रजी विषयाच्या शिक्षकासह शारीरिक शिक्षण विभागाचा शिक्षक जिल्हा परिषद शाळा खानापूर शाळेला दिला आहे. यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांपासून वेळेवर विषय शिक्षक दिले नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याबाबत गावकऱ्यांनी वारंवार जि. प. प्रशासन व शिक्षण विभागाला विनंती केली होती. तसेच या मागणीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आदोलन करण्यात आले होते. २०२३ शैक्षणिक वर्षांत शाळेत इंग्रजीचा शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत हाते. यामुळ गावकऱ्यांनी व पालकांनी १५ जून रोजी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यानंतरही मागणी पुर्ण झाली नसल्याने २१ ऑगस्ट रोजी कुलूप ठोकरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान जि.प. प्रशासनाने खानापूर शाळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षकासह शारीरिक शिक्षण विभागाचे शिक्षक देऊन विद्यार्थ्यांना आनंद द्विगुणित केला आहे. प्रशासनाच्या सततच्या अनुभवानुसार गावाकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याची तयारी केली असताना शिक्षण विभागाने खानापूर शाळेत इंग्रजी विषयासाठी शंकरराव कुद्रे तर शारीरिक शिक्षण विभागाला संजय कीर्तिवार या शिक्षकांची नियुक्ती केली आहे. यामुळे विद्यार्थी व गावकऱ्यांनी शिक्षण विभागाचे आभार मानले आहेत.
