
आज मुख्यमंत्री शिंदेंची फराळ पंगत व उद्या शेवटच्या दिवशी सार्वजनिक महाप्रसाद
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) -वैजापूर येथे आयोजित सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताह सहा दिवसात जवळपास १६ लाख भाविकांनी हजेरी लावली आहेत त्याप्रसंगी सरला बेट(गोदाधाम)चे मठाधिपती हभप रामगिरी महाराज म्हणाले की भगवंतकृपा व्हावी म्हणून भक्त मनोभावे भगवंत सेवा करीत असतो. अशा या निस्सीमपणे केलेल्या भगवंतभक्तीचा आनंद भगवंतापेक्षा भक्ताला अधिक मिळतो यामुळे भक्ताने भगवंतसेवेत कदापिही खंड पडू देऊ नये व मानवाच्या चित्तातील मलिनता मानवाला वाईट कर्म करण्यास प्रवृत्त करते. ही मानवी मनातील मालिनता दूर करण्याचे महान कार्य सदगुरू गंगागिरी महाराज आणि ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांनी सप्ताहाच्या माध्यमातून समाजात शुद्ध चित्ताच्या बिजांचे रोपण केले. मानवता धर्म उभा केला असे अमृततुल्य विचार माडले जो पर्यंत मनात अनन्यभाव येत नाही तो पर्यंत ईश्वर कृपा होत नाही, या साठी त्यांनी भगवतगीतेच्या नवव्या अध्ययातील २२ व्या श्लोकचा दाखला दिला,आजच्या अफाट जनसमुदायाची उपस्थिती पाहून ते म्हणाले की,सदगुरू गंगागिरी महाराज व ब्रह्मलिन नारायणगिरी महाराज यांनी समाज व समाजमन जोडण्याचे कार्य अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून केले तोच वसा आजही या अफाट भक्त-भाविकांच्या उपस्थिती वरून दिसून येत आहे
पहील्या दिवशी वैजापूर तालुका, येवला तालुका व नादगाव तालुका ह्या तीन तालुक्यामधून पूरणपोळी (मांडे) व त्यासाठी लाखो लिटर दूध टँकरने पंगतीत महाप्रसाद वाटप करण्यात आला होता
पाच दिवस ८००गावामधून भाकरी व सप्ताह ठिकाणी आमटी बनऊन ती टँकरच्या साहाय्याने पंगतीपर्यंत प्रसादाचे वाटप करण्यात आले होते
आज एकादशी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची फराळाची पंगत आहे एकादशीला २५० ते ३००क्विंटल साबुदाणा, ५०क्विंटल भगरीचा प्रसाद वाटप करण्याचे नियोजन आहे
उद्या सोमवार दिनांक २८ रोजीच्या महाप्रसादासाठी सहा दिवसापासून तयारी चालू आहेत बुंदि बनविण्यासाठी ५००पोते साखर व ३००क्विंटल हरभरादाळ आणी चिवड्यासाठी ७०० पोते चिवडा व ८० क्विंटलची शेव तयार करण्याचे काम चालू आहेत
राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन याठिकाणी भरवण्यात
आले आहे येथे विविध कृषी कंपन्यांनी स्टॉल लावले आहे कृषी प्रदर्शनाला तरुण शेतकऱ्यांकडून उत्कृष्ट
प्रतिसाद मिळत आहे.