
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेइ (देगलूर): दिनांक 25 ऑगस्ट 2023
वार शुक्रवार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत लातूर महानगरपालिकेतील जवळपास 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलच्या 14 वर्ष आतील एकूण 17 विद्यार्थ्यांनी व 17 वर्षातील एकूण 15 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यामध्ये 14 वर्षे वयोगटामधील मुलांनी चमकदार कामगिरी करत अंतिम सामना जिंकून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला यामध्ये संघाचा कर्णधार शिवतेज क्षीरसागर, वीर काळे, ओम मोहिते ,अभिराज लाडाने, आर्यन मनधरणे हरी ओम दीक्षित, प्रणव नवगिरे, यशराज भोसले, रणवीर पराडे, चाटे ओम, राऊत प्रद्युम्न, मोहिते रणवीर ,सूर्यवंशी स्वराज , गौरशेटे शिवरुद्र ,कृष्णा जाधव, या मुलांनी नेत्र दीपक कामगिरी करत विजयश्री खेचून आणली सतरा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत जिल्ह्यातून तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला या सर्व विद्यार्थ्यांना खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक विठ्ठल गुरमे व विशाल कांबळे सर यांचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय रमेश बिरादार मॅनेजिंग डायरेक्टर सुजित बिरादार सीईओ रामेश्वर सगरे प्राचार्य आम्रपाली सरवदे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…