
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा -आज 24/08/2023 आदरणीय खासदार माननीय सुनिलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून व मा. मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून आमदार मा. अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस म्हसळा यांचे वतीने आयोजित, वही वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना आदरनीय खासदार – सुनीलजी तटकरे साहेबांच्या कडून विद्यार्थाना वह्या वाटप करून मदत करण्यात आली. विद्यार्थी देशाचे भविष्य आहे, यालाच लक्षात घेऊन आदरणीय खासदार सुनिलजी तटकरे युवा प्रतीष्ठाण करून विद्यार्थ्यांना छोटीशी भेट.यावेळी उपस्थीत राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समीरजी बनकर, नगर अध्यक्ष- अस्सलभाई कादरी, माजी नगर अध्यक्ष दिलीपजी कांबळे, बाबू शिर्के, उपनगर अध्यक्ष संजय दिवेकर, माजी उपनगर अध्यक्ष सुनील शेडगे, नगरसेविका जयश्री कापरे नगरसेवक, निलेश कोकचा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शाहनवाज उकये,, महिला शहरअध्यक्ष- शागुफ्ता जांगिर , युवती अध्यक्ष रूषली घोषाळकर, सुहेल कोठिवले, शिक्षक वर्ग याविळे उपस्थित होते.कानिया शाळा रा.जि.पा. व न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा, येथे संपन्न झाला सर्व विद्यार्थीही देखील खुष झाले.