
सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रणिताताई देवरे यांची प्रमुख उपस्थिती…
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
लोहा येथील भारतीय डाक विभागाच्या कार्यालयातून छावा युवा संघटनेच्या वतीने छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांच्या वतीने व सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या भारत देशाचे रक्षण करणाऱ्या सिमा सुरक्षा दलाच्या जवानांना ( सैनिकांस) धागा शौर्य का राखी अभिमान की अभियानांतर्गत २१०० राख्या राखी पौर्णिमा सणानिमित्त पाठवून दिल्या.
आपल्या भारत देशात हिंदू संस्कृतीत भाऊ व बहीणीचा पवित्र राखी पौर्णिमा सण असतो .
आपले घर,गाव सोडून भारतीय सैन्यात देशाच्या सेवेसाठी गेलेल्या जवानांना राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीणी व भावाचे पवित्र प्रेम जोपासण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून छावा युवा संघटनेच्या वतीने माऊली पाटील पवार यांच्या वतीने राखीचे पार्सल पाठविण्यात येते तीच पंरपंरा माऊली पाटील पवार यांनी कायम ठेऊन दि.२५ -८-२०२३ रोजी लोहा येथील डाक विभागाच्या कार्यालयात छावा युवा संघटनेच्या वतीने भारतीय जवानांसाठी धागा शौर्य का महाराखी अभियान राबविण्यात आले.
यावेळी छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली पाटील पवार यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २१०० राख्या चे पार्सल सीमा सुरक्षा दलाच्या जवानांसाठी पाठविण्यात आल्या.
यावेळी नांदेड जिल्हा डाक अधीक्षक राजीव पाळेकर, उपअधीक्षक सुनील मामीडवार, पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे, लोहा पोस्ट मास्तर वैभव भोसीकर, कंधार पोस्ट मास्तर मदन केंद्रे, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, माजी नगरसेविका सौ.शोभाताई बगडे, डॉ. सविता घंटे, जयश्री मामिडवाड, सौ. सविता सावंत, अनुराधा नागेश्वर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाटील पवार, मिडिया पोलिस सोशल क्लब पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास सावळे, विनोद महाबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राम पाटील पवार,भानुदास पवार , व्यंकट जंगले, हनमंत बावनपले, महेश जगवड , आदी उपस्थित होते.