
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे:इंदापूर येथील प्रसिद्ध विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालया समोरील विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र या ठिकाणी करण्यात आले आहे. यावेळी मंगळवेढ्याचे प्रसिद्ध वातविकार तज्ञ व नाडी परिक्षण तज्ञ डॉ. राहुल लवटे हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरामध्ये खालील सर्व आजारांवरती मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच औषधांवरती १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यामध्ये हाडांचे व मणक्याचे विकार आमवात, मानदुखी,सांधिवात, कंबर दुखी, वातरक्त,स्पाॅन्डिलायटिस,सायटिका, गुडघेदुखी, फ्रोजन शोल्डर (अवबाहुक), मणक्यातील नस दबणे, सांध्यांची व मणक्यांची झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, हाताची व पायांची बोटे सुजणे, गुडघ्यातील वंगण (oil) कमी होणे इत्यादी आजारांवरती मोफत तपासणी केली जाणार आहे. त्वरित वेदनाशामक ठरणारी विद्धकर्म व अग्निकर्म चिकित्सा हि मोफत केली जाणार आहे. त्याचबरोबर पत्र पोट्टलो स्वेद षष्टिक पिंड स्वेद हि मोफत तपासणी केली जाणार आहे. या शिबिरामध्ये भाग घेतलेल्या रुग्णांसाठी पंचकर्म मध्ये १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. यासाठी ९३५६०५०९५२ या नंबर वरती संपर्क साधून आपण आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे.
ऑस्टीओपोरोसिस हाडांची अशी अवस्था आहे , ज्यामध्ये हाडांचे घनत्व कमी होते आणि हाडे ठिसुळ होऊ लागतात , हाडे कमकुवत होऊ लागतात. त्याच्या परिणामी हाडांच्या आजारांची सुरुवात होते. या आजारामध्ये शरिरात हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसुळ होण्याची प्रक्रिया चालू असते. परंतु त्याची कोणतीही लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत. स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा बऱ्याच अधिक प्रमाणात असते.
ऑस्टीओपोरोसिसच्या कारणांमद्धे रजोनिवृत्तीनंतर होणारे हारमोन्स मधील बदल कॅल्शियम तसेच डी जीवनसत्वाची कमतरता आणि काही दिर्घ आजारांच्या परिणामी हाडे ठिसुळ होऊ लागतात. त्याच्या परिणामी कंबर दुखी , गुडघे दुखी , सांधे दुखी , मनकयांचे आजार बळावतात. या सर्व आजारांपासून आपली सुटका करून घेण्यासाठी या शिबिरामध्ये इंदापूर तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ डॉ. स्वप्नील शंकर लोणकर यांनी केले आहे या शिबिरामध्ये आयुर्वेदीय पंचकर्म ट्रीटमेंटचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.