
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत सर्वेक्षण व ईतर अशैक्षणिक कामे शिक्षकांना लावणे हे नियमबाह्य व अन्यायकारक आहे त्या मुळे या कामावर शिक्षक सेनेने बहिष्कार टाकला आहे.व यापुढे आसे नियमबाह्य काम शिक्षकांनी करु नये असे शिक्षक सेनेचे राज्यध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी राज्यातील शिक्षक सेनेच्या राज्य विभाग,जिल्हा व तुलाका कार्यकरणी पदाधिकारी व शिक्षक सैनिकांना सांगितले आहे.तरी राज्यातील शिक्षक बंधू भगिनींनी अशैक्षणिक कामावर बहिष्कार टाकावा असे अहवान राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी केले आहे.
आर.टी.ई.ॲक्ट 2009 प्रकरण 4मधीस 27 नुसार शिक्षकांचे जनगणनेचे,निवडणूकीचेचे कामे व नैसर्गीक आपत्ती शिवाय ईतर कोणतेही काम देऊ नये असे स्पष्ट केले आहे.त्याला आनुसरुन राज्य शासन निर्णयक्र.पिआरई 2010/प्रक225/प्राशि—1 दि.18जुन 2010 नुसार शिक्षकांना वरील कामा व्यतिरिक्त कोणतेही अशैक्षणिक काम देऊ नये आसे शासन निर्णयात स्पष्ट नमुद केले आहे.तरी पण
शैक्षणिक वर्षे सुरु झाले तेंव्हापासून शिक्षकांना BLO ची कामे,शाळा बाह्य मूलांचा सर्वेक्षण,अपंग विद्यार्थांचे सर्वेक्षण, सह स्वच्छता मोहीम राबवणे, आता तर शिक्षकांना निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे शासनाने आदेश काडले आहेत.त्यामुळे विद्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.तसेच निरक्षरांचे सर्वेक्षण व इतर अशैक्षणिक काम निवडनूक पुर्व काम BLO कामे हे शालेय कामकाज सोडून सुट्टीच्या वेळेत तथा सुट्टीच्या दिवशी करवायास सांगितले आहे हे सर्व अशैक्षणिक कामे शिक्षका मार्फत करुन घेतले जात आहेत सर्वेक्षण तसेच निवडणूक पूर्व कामे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री नामदार दीपकजी केसरकर, सन्मा. रणजितसिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय व सन्मा. सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, पूणे यांना 21 आँगस्ट रोजी पत्र लिहीले आहे. यापत्रात अशैक्षणिक कामे व निरक्षरांचे सर्वेक्षण ही कामे शिक्षक करणार नाहीत असे नमूद केले आहे. निरक्षरांचे सर्वेक्षण कामावर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना बहिष्कार टाकत आहे.त्यामुळे सर्व शिक्षकांना अशैक्षणिक कामावर बहिष्कार टाकावा असे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांनी केले आहे.