
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा : – लोहा तालुक्यातील पांगरी येथील वृक्षप्रेमींनी वन विभाग हिंगोली अंतर्गत असणाऱ्या भव्य दिव्य वन उद्यानास भेट दिली .
वारंगा येथील वन उद्यानात भवानी मंदिर , भव्य शिवमंदिराचे यावेळी वृक्षप्रेमींनी दर्शन घेतले. व निर्सगाने नटलेल्या या निसर्गरम्य स्थळांची पाहणी केली.
नांदेड – हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या व हिरवा शालू नेसून हरीतमय वातावरणातील उद्यानास पाहुन पांगरी येथील वृक्षप्रेमींनी आनंद व्यक्त केला यावेळी पांगरीचे आदर्श माजी सरपंच सुदाम पा बुद्रुक , सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा पाटील , विश्वनाथ पाटील बुद्रुक , नागनाथ पा , जगन्नाथ पाटील बुद्रुक , उध्दव पा बुद्रुक सह बाळासाहेब कोपनर यांची प्रमुख उपस्थिती होती.