
मुख्यमंत्र्यांचे जरांगे सोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा नंतर ही माघार घेणार नाही एक तर आरक्षणाची विजय यात्रा नसता माझी अंत्ययात्रा मनोज जरांगे…
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळूंके
शहागड येथील गोदापट्टयातील 123 गावांसह विविध ठिकाणांहून उपस्थित राहिलेल्या मराठा समाज बांधवांमुळे विराट जनआक्रोश आंदोलन झाले या जनआक्रोस आंदोलनानंतर सरकारने कुठलीही दखल घेतली नाही कॅबिनेटच्या चार बैठकी होऊन तसेच कालपर्यंत सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका घेतलेली नाही बैठक सुरू असून बैठकीत चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाकडून करण्यात आली मात्र मराठा आंदोलकांना आक्रमक भूमिका घेतली तुमची बैठक संपवून निर्णय जाहीर करा तोपर्यंत आमचा आंतरवाली सराटी येथे आमच्या उपोषण सुरू राहील असे सरकारला सांगितले जन आक्रोश आंदोलन सरकारने कुठलेही दखल घेतली नसल्याने 30 ऑगस्ट पासून आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या सह महिला व नागरिकांना उपोषणाला प्रारंभ केला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सरकारने जी समिती स्थापन केली त्या समितीचा अहवाल घेऊन तसेच संबंधित सर्व सचिवांची बैठकी दोन दिवसात घेऊन निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनी द्वारे आंदोलकांशी चर्चा केली अंतरवाली सराटी या गावात असलेले हे बमुदत उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांनी विनंती केली परंतु जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय मराठा आंदोलकांना घेतला आहे आज दोन महिला सह 7 पुरुषांना पाठिंबा दर्शवता उपोषण सुरू केले आहे मराठा आंदोलकां मनोज जरांगे यांची प्रकृती खालवली असून त्यांनी उपचार घेण्यात नकार दिला आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून तसेच तहसील कार्यालयाकडून कर्मचारी उपोषणाच्या स्थळी उपोषण मागे घेण्याची विनंतीवरून लेखी पत्र घेऊन आले परंतु उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी घेऊन पत्र द्यावे असे आंदोलकांनी सांगितले पत्र घेण्यास नकार दिला जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णानाथ पांचाळ .पोलीस अधीक्षक तुषार दोषी. तहसीलदार चंद्रकांत शेळके. यानी दोन तासापेक्षाही अधिक आंदोलकाशी चर्चा केली पण चर्चा निष्कर्ष ठरली सरकारमधील दोन मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले परंतु आंदोलकांनी ऐकले नाही…