
लॉ,फार्मसी,इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांची “वुई वॉन्ट कॅरी ऑन” ची मागणी
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून लॉ,फार्मसी,इंजिनिअरिंग चे विद्यार्थी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे “वुई वॉन्ट कॅरी ऑन” मागणी करिता आंदोलन करिता बसले होते.परंतु त्याचे रूपांतर आता अन्नत्याग आंदोलनात झाले असून दि.३१ ऑगस्ट रोजी अन्नत्याग आंदोलनाचा पहिला दिवस होता.तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विद्यार्थ्यांच्या मागणीला प्रतिसाद न दिल्यामुळे आता हजारो लॉ,फार्मसी,इंजिनिअरिंग चे संतप्त विद्यार्थी “वुई वॉन्ट कॅरी ऑन” च्या मागणी ला घेऊन अमरावती विद्यापीठ येथे अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा उचलल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले.
अमरावती विद्यापीठ येथे ८ ते १० दिवसांपासून लॉ,फार्मसी,इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्याचे “वुई वॉन्ट कॅरी ऑन” च्या मागणी करिता आंदोलन सुरू होते.मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कुलगुरूंनी पाठ फिरवली असून विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे स्वरूप अधिक तीव्र करीत त्याचे रूपांतर आता अन्नत्याग आंदोलनात झाले आहे.पोलीस आयुक्त यांच्याकडे दि.१ सप्टेंबर रोजी विद्यार्थी कुलगुरूंची हरविल्याची तक्रार करणार असल्याचेही आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी म्हटले.तसेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे अन्नत्याग आंदोलन करून आणखी तीव्रतेने विद्यार्थी आपल्या “वुई वॉन्ट कॅरी ऑन” मागणीला यशस्वी केल्याशिवाय मागे हटणार नसल्याचेही विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केले.