
एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी दणाणले गाव…
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञान दवणे
जालना (परतुर):- मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाला सराटी येथे चालु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत सिंगोना येथील शासनाची अंत्ययात्रा काढून सकल मराठा समाजाचा पाठिंबा परतुर तालुक्यातील सिंगोना येथील सकल मराठा समाजाच्या वतीने गावात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेची अंत्ययात्रा काढून श्री मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला अंतयात्रेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून घोषणा देत अंत्ययात्रा काढण्यात आली होती या अंतयात्रेत मोठ्या प्रमाणात तरुण महिला वयोवृद्ध समाज बांधव उपस्थित होते मराठा आरक्षण देताना विलंब केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असे कृष्णा गोवर्धन सोळंके यांनी सांगितले या अंत्ययात्रेचे नियोजन कृष्णा सोळंके पाटील यांनी केले होते, मराठा समाजाची तीव्र भावना आहे आपापल्या राजकारण करण्यासाठी श्री मनोज जारंगे पाटील यांचा छळ करू नये, अशी भावना व्यक्त करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवराय, अभी नही तो कभी नही, अशा घोषणा देऊन सरकारविरोधी देखील या अंतयात्रेत घोषणा देण्यात आल्या मराठ्यांच्या मुलाबाळांना तत्काळ महाराष्ट्र सरकारने आरक्षण देऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मार्ग मोकळा करावा असे ही शेवटी समाजातील सगळ्या लोकांनी बोलून दाखवले…