
सरकार उज्वल भविष्य नस्तनाभुत करून जमिनी बळकावण्याचा करू पहात आहे – प्रवीण पेटकर…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : शासकीय शाळा बचाव संघर्ष समितीच्या वतीने अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर एल्गार पुकारला असून (ता.५) ला भव्य धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सरकार खाजगीकरण कंत्राटीकरण करून भारत देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना नस्तनाभुत करण्याचे काम करीत आहे.तसेच मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या ह्या शासकीय शाळा जमिनी विकून घश्यात घालण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे शासकीय शाळा बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी यावेळी म्हटले.
राज्य शासनाने कार्पोरेट कंपन्यांना शाळा दत्तक योजना देण्याचा,सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.यास राज्यभरातून विरोध होत आहे.अश्यातच ‘हम सब एक है’, ‘आमच्या मागण्या मान्य करा – नाही तर खुर्च्या खाली करा’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘शिक्षण वाचवा – शाळा वाचवा,’ अशा घोषणा देत सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात अंजनगाव सुर्जी येथे शासकीय शाळा बचाव संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शिवसेना उबाठा, प्रहार जनशक्ती पक्ष,बहुजन समाज पक्ष,भारतीय रिपब्लिकन पार्टी,तसेच सामाजिक संघटना लोकसंवाद सामाजिक परिषद,कर्मयोगी फाउंडेशन महाराष्ट्र,महात्मा फुले समता परिषद,दि.पावर ऑफ मीडिया,अखिल भारतीय बारी समाज महासंघ,समता सैनिक दल,राष्ट्रीय चर्मकार महासंघ,मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड,क्रांतीज्योती ब्रिगेड,जमाती इस्लामी महिला संघटना,फुले शाहू आंबेडकर विचार मंच,ओबीसी राजकीय आघाडी,अखिल भारतीय रेडिओ श्रोता महासंघ,महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था,भारतीय बौद्ध महासभा,ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन या राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक संघटनांनी,या एल्गार तथा एकदिवसीय धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला.