
दैनिक चालु वार्ता
वैजापूर तालुका प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)-श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज विद्यार्थी गुरूकुल व वृद्धसेवासदन नाशिक आयोजित शब्दप्रभू गंगाधर महाराज कवडे, सुरेश महाराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह माडसावंगी, नांदुर नाका नाशिक येथे शुन्यातून विश्व निर्माण करणार्या उद्योगपतींचा सत्कार करण्यात आला. वैजापूर तालुक्यातील तित्तरखेडा गावाचे भुमिपुत्र नंदकुमार साळुंके व शिवुर गावाचे भुमिपुत्र विवेक जाधव यांना “” युवा उद्योजक पुरस्कार”” म्हणून सन्मानीत करण्यात आले,शाल , श्रीफळ, सन्मानचिन्ह,निरंजनी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. विशेष सरकारी वकील श्रीधर माने सर नाशिक, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, श्री संत शंकर स्वामी महाराज संस्थानचे उपाध्यक्ष ह भ प सारंगधर महाराज भोपळे शास्त्री,साईनाथ आण्णा मतसागर,शिवाजी जाधव सर, या सर्व पाहुण्यांच्या यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.सन्मानाचे उत्तर देताना नंदकुमार साळुंके व विवेक जाधव म्हणाले की आम्हाला उद्योग क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले परंतु असा वारकरी संप्रदायाकडून व आपल्या माणसांकडून मिळालेला सन्मान हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. त्यांचे शिवुर व परीसरातील भाविकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.