दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:- नांदेड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात जिजाऊ नगर ता.जि. नांदेड येथे दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता एकशे अकरा एकरवर महासभेचे आयोजन केलेआहे.त्यानंतर दुपारी १ वाजता मारतळा ता.लोहा येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे व नंतर सायंकाळी ३ वाजता नरसी ता.नायगाव जि.नांदेड महासभेचे आयोजन करण्यात आले आहे व सायंकाळी ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मैदानावर कंधार तसेच कंधार येथील मुस्लिम बांधवांनी सभेसाठी मशिदीची जागा सभेसाठी दिली आहे.सर्व नांदेड जिल्हातून लाखो मराठा मुले,मुली,तरूण, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, गृहिणी, नोकरदार महिला -पुरूष बांधव या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत.त्यांच्या सोबत या सभेला सर्वच धर्मांचे लोक पण येणार आहेत;त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकायचे आहेत.मराठा आणि ओबीसी समाज गुण्यागोविंदाने नांदत एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात.मुस्लिम समाजाचा तर पूर्वीपासूनच मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या महासभेचे आयोजन नांदेड जिल्हात वाडीपाटी, मारतळा, नरसी, कंधार येथे करण्यात आले असून सर्वांनी मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहून आरक्षणाच्या लढ्यात साथ द्यावी असे सकल मराठा समाज नांदेड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.