
ॲलनच्या टॅलेंटेक्य परीक्षेतही भारतात प्रथम
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
सह्याद्री इंग्लिश स्कूल लोहा चा इयत्ता 6 वीचा विद्यार्थी यशराज नामदेव देशमुख मागच्या वर्षी 5 वी स्कॉलरशीप (शिष्यवृत्ती) परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आल्यानंतर आता नुकत्याच झालेल्या डाॅ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत 100 गुणापैकी पैकी 90 गुण मिळवुन महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ॲलन टॅलेंटेक्स- 2024 परीक्षेतही 320 गुणांपैकी 316 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक मिळवला. ॲलन ने देशात पहिला आल्याबद्दल 50000 रू रोख बक्षीस व ॲलनच्या सर्वच कोर्सेसमध्ये 100% स्कॉलरशीप दिली.
या दोन्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी शाळेचे संचालक श्री सुदर्शन शिंदे सर, सौ. शिंदे मॅडम, मुख्याध्यापक श्री मेकाले सर, श्री साई सर तसेच सर्वच शिक्षकांनी मार्गदर्शन केले याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे.