
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर): तालुक्यातील शेटफळ हवेली येथे भैरवनाथ जन्मोत्सवा निमित्त श्री ज्ञानेश्वरी पारायण २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रोज पहाटे पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ६ ते ७ अभिषेक, सकाळी ७ ते ८ अल्पोपहार,सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १ गाथा भजन, दुपारी १ ते २ भोजन, दुपारी ४ ते ५ हरिपाठ,७ ते ९ किर्तन,९ ते १० महाप्रसाद,१२ ते २ हरिजागर असा दिनक्रम असायचा.
या अखंड हरिनाम सप्ताहाचे हे २७ वे वर्षे होते.हा सोहळा उत्साहात साजरा करण्यासाठी कीर्तनासाठी महाराज हे महाराष्ट्र प्रसिद्ध असलेले यांना आमंत्रित करण्यात आले होते.यामध्ये गुरूवर्य बापुसाहेब महाराज देहुकर, केशव महाराज तोडकर,गोरख महाराज रायते, डॉ.किरण महाराज बोधले, सुहास महाराज फडतरे, जगन्नाथ महाराज देशमुख, संतोष महाराज लहाने, रामभाऊ महाराज अभंग हे होते.त्याच प्रमाणे या सप्ताहाचे व्यासपीठ चालक नंदकुमार महाराज मोरे होते.गायन व किर्तनसाथ बाबुराव महाराज शेखापुरे, गणेश महाराज भगत व त्यांचे सर्व सहकारी, हरिपाठ व काकडा गणेश महाराज भगत,ओंकार महाराज, श्रीकृष्ण महाराज भगत, नंदकुमार महाराज मोरे,मृदंगमणी धनंजय महाराज कदम, श्रीकृष्ण महाराज भगत,विणेकरी शिवाजी महाराज शिंदे,तर चोपदार म्हणून माणिक महाराज इंगळे हे महाराष्ट्रात नामाकित असणारी मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते .यांनी ही आपल्या नावाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहात आपल्या कलेने व विचाराने तसेच गायनाने उपस्थित सर्वच मंत्रमुग्ध होऊन पांडुरंगाच्या विचाराने लिन झाले.
या अखंड हरिनाम सप्ताहात रोज सकाळी व सायंकाळी हजारोंच्या पंगती उटल्या आणि या पंगतीसाठी अन्नदाते पुढे आले व त्यांनी जेवढा जनसमुदाय उपस्थित राहील तेवढ्यासाठी अन्नदान पुरेल एवढं अन्न तयार केले जात होते. तसेच रोज दिड ते दोन हजारांच्या वर जनसमुदाय उपस्थित राहत होता.पंगत कितीही मोठी असली तरी पंगतीत सगळ्यांना सर्व महाप्रसाद मिळेल असे त्यासाठी गावातील लहान मुले, तरुण व ज्येष्ठ नागरिक मनापासून काम करताना दिसत होते.भैरवनाथ जन्मोत्सव सोहळा समिती व भजनी मंडळ, शेटफळ हवेली ग्रामस्थ मागील १५ दिवसांपासून तयारी करत होते. हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी भजनी मंडळ व शेटफळ हवेली गावातील युवक वर्ग, ग्रामस्थ, भैरवनाथ जन्मोत्सव समितीचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.