
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे…
पुणे (इंदापूर): माझी वसुंधरा अभियान व ग्रामपंचायत शेटफळ हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच द ब्रिलियंट हेल्थ ॲंण्ड ॲग्री संस्था अंतर्गत सखी महिला कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या सहकार्याने किशोरवयीन मुली व महिलांसाठी मोफत कौशल्य विकास स्वयंरोजगार प्रशिक्षण दि.८ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत शेटफळ हवेली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.शासन नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियान राबवित आहे. हे अभियान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मिशन लाईफ’ला पूरक असून या माध्यमातून जागतिक पातळीवरील वातावरणीय कृती आराखड्याला समर्थन दिले जात आहे.
यामध्ये महिला सक्षमीकरण कार्यक्रम
(१) मसाला उद्योग प्रशिक्षण…
गरम मसाला,गोडा मसाला,पंजाबी मसाला,छोले मसाला,पुलाव मसाला,बिर्याणी मसाला,चहा मसाला,पापड मसाला,लाल मिरची पावडर,लोणचे मसाला,पाणीपुरी मसाला,चिकन मसाला,सांबार मसाला,मिसळ मसाला,तांबडा मसाला, पांढरा रस्सा मसाला,मालवणी संडे मसाला,मालवणी शेंगदाणे चटणी,कांदा लसुण मसाला,चिवडा मसाला,भडंग मसाला, दाबेली मसाला,चकली मसाला,काजू मसाला,मच्ची मसाला,मटण मसाला,दुध मसाला,मट्टा मसाला,पापड मसाला,लिंबू लोणचे,पावभाजी मसाला,चाट मसाला,पनीर टिक्का मसाला,व्हेज बिर्याणी मसाला,भेडगी चटणी पावडर,किचन किंग मसाला,दम बिर्याणी मसाला,बडीशेप मसाला. इ.
मसाले प्रॅक्टिकली करून घेतले जातील.
(२) सोप मेकिंग प्रशिक्षण
डेटॉल साबण, मेडिमिक्स साबण, डव्ह साबण, संतूर साबण, चारकोल साबण…
(३) अगरबत्ती उद्योग प्रशिक्षण ही दिले जाणार आहे तरी जास्तीत जास्त मुलींनी व महिलांनी भाग घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत शेटफळ हवेली यांच्या वतीने करण्यात आले आहे.